माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. शहरातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पुणे, दि. १५ डिसेंबर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकी स्वाराला मारहाण केली होती. अटक टाळण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून छातीत दुखत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी ससून रुग्णालयात तपासणी करून त्यांना रिसतर अटक केली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. शहरातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत अमन अजय चड्डा यांनी फिर्याद दिली होती. किरकोळ अपघाताच्या वादातून जाधव यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अमन अजय चड्डा यांनी केला आहे.