प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती.
दिल्ली, दि. ३१ ऑगस्ट : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. १० ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितले होते. प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी 10 ऑगस्टला पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.