'मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम' या विकारासाठी आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते.
नवी दिल्ली, दि. २७ सप्टेंबर : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचे आज पहाटे ६ वाजून ५५ मिनिटानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांना दि. २५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर 'मल्टीऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम' या विकारासाठी आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे."जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल मोदींनी शोक व्यक्त केला.त्यांनी ट्वटिमध्ये म्हटले की, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे."