IMG-LOGO
राष्ट्रीय

सोने-चांदी स्वस्त ; आज पुन्हा झाली इतकी घसरण

Wednesday, Aug 19
IMG

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारपेठेतील ९९.९ टक्के शुद्धतेचे सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम, ५३ हजार ६७४ रुपये वरुन, ५४ हजार ८५६ रुपये प्रति १० ग्राम झाले होते

मुंबई, दि. १९ ऑगस्ट :  भारतीय बाजारात बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमती उतरल्या.  अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे परकीय बाजारात सोने खरेदी स्वस्त झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किंमती प्रति २ हजार  डॉलर खाली आल्या आहेत.एमसीएक्सवरील ऑक्टोबरच्या सोन्याचे वायदे ०.५ टक्क्यांनी घसरून ५३ हजार नं ३१३ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. तसेच, चांदीचा वायदा ०.८ टक्के  घसरून ६८ हजार ९३८ प्रती किलोग्रॅम झाला. गेल्या दोन सत्रात सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅम १ हजार ३०० रुपयांनी वधारल्या होत्या, तर चांदी प्रति किलोग्रॅममागे २ हजार १०० रुपयांनी वाढली होती.आज देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या किंमती घसरू शकतात. यापूर्वी मंगळवारी दिल्ली सराफा बाजारपेठेतील ९९.९ टक्के शुद्धतेचे सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम, ५३ हजार ६७४ रुपये वरुन, ५४ हजार ८५६  रुपये प्रति १० ग्राम झाले होते, त्या दरम्यान प्रति दहा ग्रॅमला किंमतीत १ हजार १८२ रुपयांची तेजी आली होती. त्याचबरोबर मुंबईतील ९९.९ टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ५३ हजार ८९४ रुपयांवर गेली होती.

Share: