जाहिरात म्हणजे प्रत्येक माध्यमाचा श्वास आहे...आणि आज आणि इथून पुढे जाहिरातींचे महत्त्व वाढेलच पण कधीही कमी होणार नाही..कोणताही व्यवसाय असू दे..जाहिरात हवीच....
राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा पुणे, दि. १४ ऑक्टोबर : प्रसिध्दी माध्यम मग ते कोणताही असो...वृत्तपत्र,मासिके,नियतकालिके, रेडिओ, टेलिव्हिजन,होर्डिंग्ज,एसएमएस,इमेल्स,ते अगदी डिजिटल आणि सोशल मीडिया.....प्रत्येक माध्यम यशस्वी होण्यासाठी त्या माध्यमाचे रंगरूप,आकार,त्यातील कंटेंट,छपाई,तंत्रज्ञान,.....वितरण,वेगवेगळ्या आकर्षक योजना....या व अशा सर्व आवश्यक गोष्टींबरोबरच सर्वात महत्वाचा घटक म्हणजे या माध्यमांना मिळणाऱ्या जाहिराती.. खरं तर आर्थिक दृष्ट्या माध्यमाच्या मालकांना जाहिरातींचा फार मोठा हातभार असतोच.आजच्या जगात मोबाईल,इंटरनेट च्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्याबरोबर जगाला घेऊन जगतो आहे.पण हे करत असताना सतत जाहिराती पण आपल्याला दिसत असतात.काही टी व्ही चॅनल्स तर ब्रेक फ्री सिनेमे दाखवतात,काही रेडिओ चॅनल्स जाहिरातींचा वेळ कमी ठेवतात....परंतु जाहिरातींचे महत्व अजिबात कमी झालेले नाही व यापुढील काळात होणारही नाही.छोट्या पिन पासून...विमानापर्यंत..जाहिराती आपल्याला दिसतात किंवा आपण ऐकतो...सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या लाईफ स्टाईल प्रमाणे सर्व माध्यमांमध्ये जाहिराती दिसतात.आता या जाहिराती आकर्षक,ग्राहकांना आवडतील अशा तयार करणे हे खरंच शिवधनुष्य पेलण्याचा भाग आहे अर्थातच काही ठराविक जाहिराती सोडल्या तर.आणि हे काम जाहिरात संस्था करत असतात पण दुर्दैवाने जाहिरात संस्थांना काही माध्यमांमध्ये फक्त त्यांना मिळणारे कमिशन यापुरतेच मर्यादित ठेवले जाते.पण काही जाहिरात संस्था खूप उत्कृष्ट काम करतात आणि त्यांच्या कल्पकतेने उत्पादने प्रसिद्ध होतात आणि त्यांचा खप वाढतो हेही लक्षात घेतले पाहिजे.उदा. अमूल ची उत्पादने,विको..अशी बरीच आहेत.जाहिरात विश्वातील अनेक दिग्गजांबरोबर आजपर्यंत बोलल्यानंतर एकच सत्य मला जाणवले आहे ते म्हणजे जाहिरात म्हणजे प्रत्येक माध्यमाचा श्वास आहे...आणि आज आणि इथून पुढे जाहिरातींचे महत्त्व वाढेलच पण कधीही कमी होणार नाही..कोणताही व्यवसाय असू दे..जाहिरात हवीच....आजच्या राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त सर्व माध्यमांना,जाहिरात दारांना,जाहिरात संस्थांना आणि मुख्य म्हणजे सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा... संतोष धुमाळ...राजन मीडिया स्टेशन,पुणे