केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येचे आरोप केले आहेत आणि हाथरस येथील स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे.
लखनौ, दि. १८ डिसेंबर : उत्तर प्रदेश हाथरस येथे १९ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयने चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आधार म्हणून सीबीआयने आपल्या आरोपपत्रात पीडितेचे शेवटचा जबाब ग्राह्य धरला आहे. आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येचे आरोप केले आहेत आणि हाथरस येथील स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे.१४ सप्टेंबर रोजी दलित समाजातील या २० वर्षीय मुलीवर उच्चजातीतील चार जणांनी सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणाचे पडसाद संपुर्ण देशभर उमटले होते. राजकीय वर्तुळातही हे प्रकरण चांगलेच तापले होते.उत्तरप्रदेश पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारीने हाताळले होते. आणि या मुलीचा अंत्यविधी मध्यरात्री आई वडिलांच्या अनुपस्थितीतच उरकण्यात आला होता. त्यामुळेही या प्रकरणी संतापजनक प्रतिक्रीया उमटली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने आणखी काहीं कालावधी मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना आणखी वेळ दिला असून याची पुढील सुनावणी आता जानेवारी महिन्यात होणार आहे.