एनसीबीने रियाला ६ सप्टेंबरला अटक केली होती. त्यानंतर रिया न्यायालयीन कोठडीत भायखळा तुरुंगात होती.
मुंबई, दि. ०७ ऑक्टोबर : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सलग तीन दिवस चौकशी केली होती. अखेर एनसीबीने रियाला ६ सप्टेंबरला अटक केली होती. त्यानंतर रिया न्यायालयीन कोठडीत भायखळा तुरुंगात होती.