IMG-LOGO
महाराष्ट्र

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विजेच्या मागणीत वाढ

Monday, Mar 01
IMG

कोरोनाचे संक्रमण वाढत असले, तरी राज्यातील औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर आता वाढत आहे.

मुंबई, दि. १ मार्च : उन्हाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात राज्याची विजेची मागणी वाढली आहे. शनिवारी २४ हजार ५५१ मेगावाॅट विजेची गरज भासली. एप्रिल व मे महिन्यात राज्याची मागणी २६ हजार मेगावाॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे विजेची मागणी सहा हजार मेगावाॅटपर्यंत घसरली होती.कोरोनाचे संक्रमण वाढत असले, तरी राज्यातील औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर आता वाढत आहे. शनिवारी राज्याला २४ हजार ५५१ तर महावितरणला २२ हजार ४१ मेगावॅटची गरज भासली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने विजेची मागणी सुमारे दीड हजार मेगावाॅटने वाढली आहे. आगामी काळात एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर सर्वाधिक राहणार असल्याने या काळातही विजेची उच्चांकी मागणी राहील, या दृष्टीने महानिर्मिती व वितरणने नियोजन केले आहे. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा समाधानकारक आहे.महानिर्मितीने सध्या वेस्टर्न कोल्ड फील्डच्या कोळशासोबतच ऑस्ट्रेलियातून आयात केलेल्या कोळशाचा वापरही वाढवला आहे. यामुळे जुन्या संचातूनही पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करता येणार आहे. आयात कोळशाचा उष्मांक अधिक असल्याने कमी प्रदूषण व इंधनात विजेची निर्मिती करता येईल.महानिर्मितीने विजेची मागणी वाढत असल्याने जुने व बंद असलेले संचही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यानुसार भुसावळ व परळीचे जुने संच वीजनिर्मितीसाठी सुरू केले आहेत. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यास खासगी वीज उत्पादक कंपन्यांसोबतच बंद पडलेले जुने संच सुरू करून गरज भागवली जाईल.

Share: