माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेल्या अॅप्सला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व, एकतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली, दि. ०२ सप्टेंबर : भारत-चीनमध्ये सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पबजीसह 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. याआधी देखील सरकारने चीनी कंपन्यांच्या अनेक मोबाईल अॅप्सवर बंदी घातलेली आहे.माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेल्या अॅप्सला देशाच्या सुरक्षा, सार्वभौमत्व, एकतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अॅप्सवर बंदी घातल्याची माहिती देताना मंत्रालयाने सांगितले की, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 69 अ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. हे सर्व 118 अॅप्स विविध प्रकारचा धोका निर्माण करत होते. ज्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.