IMG-LOGO
राष्ट्रीय

नोकरी मागणार्यांना ठरवले जाते देशद्रोही

Friday, Mar 12
IMG

राहुल यांनी एक ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल विविध विषयांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राहुल गांधी यांची टीका; भारतात लोकशाही राहिली नाहीनवी दिल्ली, दि. १२ मार्च : नोकरी मागितल्यावर तरुणांना मोदी सरकार देशद्रोही ठरवत आहे, असा हल्लाबोल खासदार राहुल गांधी यांनी केला. राहुल यांनी एक ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल विविध विषयांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये राहुल यांनी स्टुडंट वाँटस् जॉब या हॅशटॅगचा वापर करत विद्यार्थ्यांना नोकरी पाहिजे; मात्र सरकार पोलिसांच्या छड्या, वॉटर गनचा वापर, देशद्रोह्याचा शिक्का आणि बेरोजगारी देत आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वीडनमधील व्ही-डेमोक्रसी नावाच्या एका संस्थेने लोकशाही बाबत एक अहवाल सादर केला आहे. या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत राहुल यांनी, भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नसल्याचे मोठे वक्तव्य केले. त्यांनी एका वृत्ताचा स्क्रिनशॉट आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून करत हा दावा केला.दरम्यान, राष्ट्रीय निवडणूक सर्व्हेक्षण अहवालात 25 टक्के तरुणांनी बेरोजगारीची समस्या हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे लोकसभा निवडणुकीवेळी सांगितल्याचे म्हटले आहे. देशभरातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी अधिकाधिक तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. तीनपैकी दोन तरुणांनी खासगी नोकरी, सरकारी नोकरी की स्वतःचा व्यवसाय या पर्यायांमधून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला, तर दहापैकी एका तरुणाने खासगी नोकरीचा पर्याय निवडल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.

Share: