IMG-LOGO
राष्ट्रीय

इशरत जहाँवर तुरुंगातच हल्ला

Wednesday, Dec 23
IMG

इशरत हिच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला तसेच तिला मारहाण करण्यात आल्याचे या अर्जात म्हटले गेले. तिहार तुरुंगात झालेल्या कथित हल्ल्यादरम्यान इशरत हिच्या डोक्यावर वार करण्यात आले तसेच तिचे कपडेही फाडण्यात आले.

नवी दिल्ली, दि. २३ डिसेंबर  : आपल्यावर तुरुंगात हल्ला झाल्याचा आरोप दिल्ली दंगलीतील एक आरोपी इशरत जहाँ हिने केला आहे. या प्रकरणात इशरतच्या वकिलांकडून न्यायालयात एक अर्जही दाखल करण्यात आला आहे. इशरत हिच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला तसेच तिला मारहाण करण्यात आल्याचे या अर्जात म्हटले गेले. तिहार तुरुंगात झालेल्या कथित हल्ल्यादरम्यान इशरत हिच्या डोक्यावर वार करण्यात आले तसेच तिचे कपडेही फाडण्यात आले. तुरुंगातील इतर महिला कैद्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप इशरतने केला. तुरुंगात झालेल्या या हल्ल्यानंतर इशरत मानसिक तणावाखाली आहे. तसेच तुरुंगात राहणे तिच्यासाठी आणखीच कठीण झाल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे. न्यायालयाने यावर तुरुंग अधिका-यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तिहार तुरुंगाचे पोलिस महासंचालक संदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इशरत आणि इतर महिला कैद्यांमध्ये तुरुंगात भांडण झाले होते. त्यानंतर पुढचा वाद टाळण्यासाठी इशरत आणि संबंधित महिला कैद्यांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये हलवण्यात आले आहे. दिल्ली दंगलप्रकरणी इशरत हिच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share: