IMG-LOGO
राष्ट्रीय

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

Friday, Aug 28
IMG

आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागीतली आहे.

टोकिओ, दि. २८ ऑगस्ट : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आज (२८ ऑगस्ट) आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जपानमधील स्थानिक मीडीयाच्या हवाल्यानुसार, शिंजो आबे यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचे राष्ट्रीय प्रसारक एनएचके यांच्या वृत्तानुसार, जपानी पीएम शिंजो आबे प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदभार सोडणार आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारी कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. शिंजो आबे त्याच्यावरील उपचारासाठी नुकतेच दोन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. दरम्यान त्यांना अल्सरेटिव कोलाइटिस चा त्रास आहे.आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागीतली आहे. ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्याने मनाला प्रचंड वेदना होत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. सलग साडेसात वर्ष जपानचे पंतप्रधानपद भूषणवण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.जपानचे सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे पंतप्रधान शिंजो आबे यांनी शुक्रवारी सांगितले की, माझ्या बिघडलेल्या आरोग्यामुळे आपण राजीनामा देत आहात आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून त्यानी अर्थव्यवस्था वाढीस पुनरुज्जीवित करण्याचा आणि तिला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला. मी जर लोकांसाठी सर्वोत्तम निर्णय घेऊ शकत नाही तर मी पंतप्रधान पदावर राहू शकत नाही. मी माझ्या पदावरून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.

Share: