संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे, असं सांगतानाच येत्या दोन महिन्यात आपलेच सरकार येणार असं ते हे सरकार आल्यापासून सांगत आहेत. आज आम्ही एक वर्षही पूर्ण केलंय.
अकोला, दि. २७ नोव्हेंबर : नाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे अशी टीका करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आज सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीवर नारायण राणेंनी कडाडून टीका केली आहे. या सरकारने ६५ हजार कोटींचं कर्ज मागील सहा महिन्यात काढून ठेवलं आणि राज्य दिवाळखोरीत नेलं असाही आरोप नारायण राणे यांनी केला. या टीकेला जयंत पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली. राणे वारंवार राज्य सरकारवर टीका करत असल्याने त्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं, असं सांगत राणेंची खिल्ली उडवली. संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे, असं सांगतानाच येत्या दोन महिन्यात आपलेच सरकार येणार असं ते हे सरकार आल्यापासून सांगत आहेत. आज आम्ही एक वर्षही पूर्ण केलंय. तरी त्यांचं तेच पालुपद सुरू आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.