IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी कैलास जाधव

Wednesday, Aug 26
IMG

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे ५ डिसेंबर २०१८ ला रूजू झाले होते. त्यानंतर त्यांचे नाशिक शहराला स्मार्ट बनविण्यात मोलाचे योगदान आहे.

नाशिक, दि. २६ ऑगस्ट : महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या यांची बदली झाली असून त्यांच्याजागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कार्यरत असलेले कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे ५ डिसेंबर २०१८ ला रूजू झाले होते. त्यानंतर त्यांचे नाशिक शहराला स्मार्ट बनविण्यात मोलाचे योगदान आहे. आताच स्वच्छ भारत अभियानात नाशिक देशात अकरावा क्रमांक तर स्मार्ट सिटीमध्ये राज्यात नाशिकला अव्वल स्थान मिळवून दिले आहे. दरम्यान आयुक्त गमे यांची बदली होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच माध्यमांमध्ये होत होती. त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता मात्र सायंकाळी शासनाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कार्यरत असलेले कैलास जाधव यांची नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

Share: