मागच्या मॅचमध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल.
अबु धाबी, दि. ०१ ऑक्टोबर : आयपीएलच्या 13व्या मॅचमध्ये पंजाबने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मागच्या मॅचमध्ये सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबई पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर पंजाबने मुरुगन अश्विनच्याऐवजी गौतमला संधी दिली आहे.