IMG-LOGO
राष्ट्रीय

गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

Tuesday, Dec 15
IMG

सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो.

नवी दिल्ली, दि. १५ डिसेंबर : तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.१४.२ किलो सिलेंडर च्या किंमतीत५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ५ किलो सिलेंडरच्या किंमतीत १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.१९ किलोच्या सिलेंडरमध्ये३६.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १२ सिलिंडवर अनुदान दिले जाते. मात्र त्यानंतर प्रत्येक सिलिंडर बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो. स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर गरिबांना मोठ्या संख्येने वितरित केले आहेत. देशात गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मंगळवारपासून पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही.

Share: