IMG-LOGO
नाशिक शहर

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक, नाशिकसह राज्यभरात मोर्चे

Thursday, Nov 26
IMG

लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना सरसकट वीज बीलं देण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात आता मनसे सामान्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने सामान्यांना वीज बिलामध्ये सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

नाशिक/मुंबई दि. २६ नोव्हेंबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लोकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलांच्या माफीबाबत राज्यातील विरोधात ठाकरे सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले. मात्र अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान नाशकात महाराष्ट्र नवनिर्माणच्या शिष्टमंडळांने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले. सरकार गंभीर असेल तर दखल घेईल, अन्यथा सरकारला मनसेच्या भाषेत इथून पुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तर पोलीस आपलं काम करतात. आम्ही आमचं काम करतो आहे, आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान, जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना सरसकट वीज बीलं देण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात आता मनसे सामान्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने सामान्यांना वीज बिलामध्ये सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

Share: