IMG-LOGO
महाराष्ट्र

मनसेचे अ‍ॅमेझॉनमध्ये खळ्ळखट्याक, पुण्या-मुंबईतील कार्यालये फोडली

Friday, Dec 25
IMG

मनसेचे कोंढवा प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हे तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानुसार ’नो मराठी, नो अ‍ॅमेझोन’ म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

पुणे, दि. २५ डिसेंबर :   पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. ’मराठी नाही तर अ‍ॅमेझोन नाही’, असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कोंढव्यातील अ‍ॅमेझॉनचं कार्यालय फोडले. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे.मनसेचे कोंढवा प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली हे तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानुसार ’नो मराठी, नो अ‍ॅमेझोन’ म्हणत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने अ‍ॅमेझोनकडे केली होती. तसे केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते वेबसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे आहे; मात्र अ‍ॅमेझोनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‍ॅमेझोनविरोधात मोहीम हाती घेतली.मनसे आणि अ‍ॅमेझोन यांच्यात सुरु असलेला ’नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चांगलाच चिघळला आहे. मुंबईतही अ‍ॅमेझॉनचे कार्यालय तोडण्यात आले. अ‍ॅमेझॉनच्या कामात अडथळा नको, न्यायालयाचे मनसेला आदेश; पाच गुन्हे दाखल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनमधील वादात दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयाने मनसेला अ‍ॅमेझॉनच्या कर्मचार्‍यांच्या कामात अडसर आणू नये, असा आदेश दिला आहे. कंपनीने मनसेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.  अ‍ॅमेझॉनच्या ऑनलाइन अ‍ॅप्सवर मराठी भाषा नाही, यावरुन मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधात अभियान सुरू केले आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी सांगितले, की अ‍ॅमेझॉनची सेवा दक्षिण भारतीय भाषांसाठी काम करीत आहे; मात्र ही सेवा मराठीतून नाही. त्यामुळे आम्ही कंपनीला त्यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी अर्ज केला होता. यादरम्यान पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठका झाल्या; मात्र अ‍ॅमेझॉनने ऐकले नाही. उलट न्यायालयाचे दार ठोठावले. कंपनीने मनसेविरोधात न्यायालयात पाच गुन्हे दाखल केले आहेत.अ‍ॅमेझॉनच्या वकिलांनी सांगितले, की प्रतिवादी मनसेचे कार्यकर्ते अ‍ॅमेझॉनला धमकी देत आहेत आणि प्रतिवादी अनुचित प्रकारे कर्मचा-यांची मदत घेत आहे. ते कार्यालयातील काम करणा-या कर्मचा-यांना भडकावत आहेत. यावर मनसेने क्षेत्राधिकारचा मुद्दे पुढे केला आणि अ‍ॅमेझॉनकडून केलेल्या तक्रारीवर विरोध दर्शवला. दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिलासा देत म्हटले, की हे पाहून असे वाटते, की वादीला काम करण्यासाठी सुरक्षा देणे आवश्यक आहे. जर असे केलं नाही, तर व्यवसायात काम करताना अनेक अडचणी येतीलफ्लिपकार्टकडून मराठीचा वापरअ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅपवर आणि संकेतस्थळावर मराठीचा वापर करावा, यासाठी मनसे-अ‍ॅमेझॉनचे रस्त्यावरचे भांडण आता न्यायालयात गेले असताना अ‍ॅमेझॉनची मुख्य स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने मात्र मराठीचा स्वीकार केला आहे. 

Share: