IMG-LOGO
महाराष्ट्र

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा

Monday, Apr 05
IMG

अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतून महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते.

मुंबई, दि. ५ एप्रिल :  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने कथित 100 कोटी खंडणीप्रकरणाची चौकशी CBI कडे दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवारांना भेटून, त्यांनी राजीनामा दिला. यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन राजीनामा सोपवला.अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतून महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात केला होता. २० मार्चच्या या पत्राने मोठा गदारोळ उडाला होता. याप्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णयही घेतला होता.

Share: