IMG-LOGO
COVID-19

आज राज्यात ४ हजार ३९५ रुग्णांना डिस्चार्ज

Tuesday, Dec 15
IMG

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ६ हजार ८०८ नमुन्यांपैकी १८ लाख ८६ हजार ८०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई, दि. १५ डिसेंबर : राज्यात गेल्या २४ तासांत नव्या ३४४२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज ७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१३५६ पर्यत खाली आली आहे. तसेच आज ४३९५ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ६ हजार ८०८ नमुन्यांपैकी १८ लाख ८६ हजार ८०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २४ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ७१ हजार ३५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share: