IMG-LOGO
COVID-19

राज्यात आज 8807 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

Wednesday, Feb 24
IMG

राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

मुंबई, दि. २४ फेब्रुवारी : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे. राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर 80 मृत्यू झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे विषाणू सापडले आहेत. केरळ आणि तेलंगणामध्येही त्याच स्वरूपाचे विषाणू आढळले आहेत. केंद्र सरकारकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. मात्र या राज्यांमध्ये वाढणाऱया रुग्णसंख्येला हे नवे विषाणू जबाबदार आहेत असे सध्यातरी सांगता येणार नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे.  मुंबईसह राज्यभरात आटोक्यात आलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतो आहे. त्यात महाराष्ट्र व केरळात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याचे समोर आल्यानंतर चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने खबरदारी घेतली असून कठोर निर्बंध घातले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या तरी कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळलेला नाही. या आधी मुंबईत युके स्ट्रेनचे पाच रुग्ण आढळले होते. मात्र हे सर्व रुग्ण बरे झाले.

Share: