भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्यांना काय दिलात याचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतर लोकनेत्यावर बोलण्याचे धाडस करावे अशा शब्दात महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई दि. १२ ऑक्टोबर : शरद पवारसाहेबांवर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले ते आधी पहावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांचा समाचार घेतला आहे.शरद पवारसाहेबांवर टीका करणार्या माजी मंत्री अनिल बोंडे यांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी एका झटक्यात केली होती. तुम्ही मात्र तत्वत: आणि नियम अटी टाकून शेतकर्यांना झुंजवत राहिलात असा आरोप महेश तपासे यांनी केला. अनिल बोंडे तुमच्या प्रदेशाध्यक्षांना शरद पवारसाहेबांवर पीएचडी करायला जमलं नाही तर तुम्हाला शरद पवार साहेब समजायला सात जन्म घ्यावे लागतील असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे. तुम्ही भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्यांना काय दिलात याचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतर लोकनेत्यावर बोलण्याचे धाडस करावे अशा शब्दात महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.