IMG-LOGO
राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांचा उद्या शपथविधी

Monday, May 03
IMG

सर्व आमदारांची शपथविधी सहा मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली.

कोलकात्ता, दि. ३ मे  : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूल काँग्रेसने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसर्‍यांदा सत्ता मिळवली. आता 5 मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सर्व आमदारांची शपथविधी सहा मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय झाला आहे. तर, शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही. राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या सर्वांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रिपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. ममता बॅनर्जींनी सर्व आमदार, नेते व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे, की कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नका, जल्लोष करू नका असे ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Share: