पुरालिया येथील सभेत भाजप खोटा प्रचार करत असल्याचा आरोप ममतादीदींनी केला. भाजप फेक व्हिडीओ पसरवत, फेक व्हॉटस अॅप ग्रुप बनवत.
कोलकाता, दि. २० जानेवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप माओवाद्यांपेक्षा भंयकर पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध सर्वे दाखवले जात आहेत. हे सर्व्हे ममतादीदींनी नाकारले आहेत. मत चाचण्यांच्या निष्कर्षापेक्षा चौपट जागा तृणमूल काँग्रेस जिंकील, असा दावा त्यांनी केला. पुरालिया येथील सभेत भाजप खोटा प्रचार करत असल्याचा आरोप ममतादीदींनी केला. भाजप फेक व्हिडीओ पसरवत, फेक व्हॉटस अॅप ग्रुप बनवत. चुकीची माहिती पसरवतो. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी विकासाबद्दल मोठे दावे केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपवाले बंगालमधून पळून गेले आहेत. भाजपाले निवडणुकीपूर्वी मिठाई देण्याची आश्वासने देत आहेत. भाजप केवळ खोट बोलण्याचे काम करतो. झारखंड आणि ओडिशामध्ये भाजप सत्तेत नाही, अशी टीका करून त्या म्हणाल्या, की बंगालच्या निवडणुकीपूर्वी वेगवेगळे पोल दाखवले जात आहेत. भाजप माध्यमांना प्राप्तिकर विभागाची भीती दाखवतो आहे. योग्य गोष्टीला अयोग्य आणि अयोग्य गोष्टीला योग्य दाखवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे माध्यमांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. भाजपला शेलकी अजगर, किंग कोब्रा अशी शेलकी विशेषणे ममता दीदींनी दिली. भाजप दगाबाज आहे जनतेने त्यांना मतदान करू नये. दररोज धमकावले जात आहे. बंगालची विक्री होऊ देणार नाही. भाजपसमोर बंगाल कधीच झुकणार नाही, असे ममता म्हणाल्या. दरम्यान, दक्षिण दिनाजपूर येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या या कार्यकर्त्यावर गोळीबार होताना पाहून पक्षाच्या पंचायत समितीच्या सभापतींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही याच झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूलचा कार्यकर्त्यांमध्ये एका शुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर हा गोळीबार झाला; मात्र हा वाद नक्की कशावरून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव संजीत सरकार असे आहे. ज्यावेळी हा सारा प्रकार घडला, त्या वेळी तिथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत समिती सभापती कालीपद सरकारही उपस्थित होते. कार्यकर्त्यांमधील वादातून झालेला गोळीबार पाहून कालीपद सरकार यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.हत्येत भाजपचा हात?सोमवारीही राज्यातील जलपायगुडी जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. रंजीत अधिकारी असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तृणमूल काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे; मात्र भाजपने हा दावा फेटाळत सत्तेत असणार्या पक्षामधील अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले आहे.