निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली
मुंबई, दि. १८ जून : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सर्वांत मोठा ट्विस्ट आला आहे. चकमक फेम अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा हे हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे.निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनीष सोनी या आरोपींनी केल्याचे एनआयएच्या वकिलांनी सांगितले. हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना वाझे यांच्यासोबत सतीश, मनीष आणि शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनीष यांनी हिरेन यांची हत्या केल्याची कबुली दिली. वाझे आणि शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी शर्मा आणि वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी केला आहे.सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा हिरेन हत्येत सहभाग होता. सोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही होते. वाझे आणि शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेनच्या हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत. शर्मा हे निवृत्त आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर मिळाली आहे. ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे, असे वकिलांनी न्यायालयात सांगितले. हिरेन हत्येनंतर सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. सर्व आरोपी दोघांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत.वाझे आणि सुनील मानेला अटक केल्यानंतर इतक्या वेळानंतर या आरोपींना का अटक केली, असा प्रश्न न्यायालयात विचारण्यात आला. त्यावर, ’ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांना आतापर्यंत अटक केली नव्हती. हे आरोपी पोलिस अधिकारी आहेत. त्यामुळे तपास कसा भरकटवायचा याची पूर्ण माहिती त्यांना आहे; पण आता एनआयए वकिलांकडून माहिती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. जी तवेरा गाडी मनसुखच्या हत्येच्या वेळी वापरली गेली, त्यात मनसुखसह चौघांचे डीएन या कारमध्ये सापडले. याचे ठोस पुरावे एनआयएकडे आहेत.मनसुखला वाझेनेच फोन करून बोलावले. त्या वेळी गाडीत वाजेसोबत मानेही होता. या दोघांनी मनसुखला मनीष, संतोष, आनंद, सतीशच्या गाडीत बसण्यास सांगितले. चार मार्चला मनसुख घराबाहेर पडले आणि पाच मार्चला मनसुखचा मृतदेह सापडला, असा घटनाक्रम असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आल्याची माहिती आहे. या सार्या युक्तिवादानंतर तिघांना 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.