मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते.
मुंबई, दि. ०२ सप्टेंबर : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. राज्य सरकारने मिशिन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये चित्रपट आणि टीव्ही सिरीयलच्या शूटिंगला परवानगी दिली आहे. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील कोरोनाने शिरकाव केला आहे.यामध्ये मराठीतील एका दिग्गज अभिनेत्यासह 6 कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले होते.त्यानंतर आता आणखीन काही मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉस मराठीच्या सीझन 2 मधील स्पर्धक अभिजीत केळकर आणि तुला पाहते रे मालिकेतील अभिनेत्री पूर्णिमा डे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.नुकतेच झी युवा वाहिनीवरील सिंंगिंग स्टार या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोमध्ये अभिजीत व पुर्णिमा स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. या शोच्या सेटवरच रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांंना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती मात्र आता ते दोघेही बरे झाले आहेत.सेटवरील दोन क्रू मेंंबर्स सुद्धा कोरोनाबाधित आहेत असे समजते आहे. त्यामुळे 10 सप्टेंबरपर्यंत या शोचे शूटिंग बंद आहे. अभिजीत केळकरने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे इंस्टाग्रामवर सांगितले. त्याने लिहिले की, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली.