यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अॅमेझॉनने मराठी भाषेचा अॅपमध्ये समावेश करण्यास तयारी दर्शविली.
मुंबई, दि. २० ऑक्टोबर : ऑनलाइन शॉपिंगसाठी देशात आघाडीवर असलेलया अॅमेझॉन अॅपमध्ये आता मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. मनसेने दिलेल्या खळ्ळ खटॅकचा इशा-यानंतर अॅमेझॉन इंडियाने ही भूमिका घेतली आहे.मराठी भाषेचा अॅमेझॉन अॅपमध्ये समावेश करण्याबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ई-मेलला कंपनीने उत्तर दिले होते. त्यानंतर एक बैठकीही झाल्या. या ईमेलचा स्क्रिन शॉट अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. जेफ बेझोस आपला इमेल मिळाला आहे, अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला याची माहिती दिली आहे असे अॅमेझॉनच्या वतीने कार्तिक यांनी लिहिले आहे.यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अॅमेझॉनने मराठी भाषेचा अॅपमध्ये समावेश करण्यास तयारी दर्शविली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या ई-मेलची दखल घेत २० दिवसांमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात येईल असे सांगितले.