सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. तीन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ तीन मोठे स्फोट झाले.
सूरत, दि. २४ सप्टेंबर : गुजरातमधील सूरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लाण्टला आज ( दि. २४ ) भीषण आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास प्लाण्टमध्ये मोठे स्फोटाचे आवाज झाले आणि त्यानंतर आगीचे लोळ उठले. स्फोटाचा आवाज इतका भयानक होता की १० किमी पर्यंत तो ऐकू गेला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हा स्फोट कशामुळे झाला ते समजू शकलेले नाही. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. तीन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ तीन मोठे स्फोट झाले. त्यानंतर येथील टर्मिनल दोनला आग लागली. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाल्याचे प्रथमिक वृत्त हाती आलेले नाही. सध्या या प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात आलेला नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु आहे असं सुरत प्रशासनाकड़ून स्पष्ट करण्यात आले आहे.