पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती न्यायालयाने दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अमरावती, दि. १५ ऑक्टोबर : महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती न्यायालयाने दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निकालानंतर लगेच जामीनही मंजूर करण्यात आलेला आहे.यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेलं होतं. हे प्रकरण आठ वर्षे जूने असून त्यात अमरावती न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.