IMG-LOGO
राष्ट्रीय

मोदी सरकारची करदात्यांसाठी मोठी घोषणा

Monday, Aug 24
IMG

गृहपयोगी असलेल्या तेल, टूथपेस्ट, आणि साबणावरील कर कमी करण्यात आला आहे.

दिल्ली, दि. २४ ऑगस्ट : मोदी सरकारने करदात्यांसाठी आज महत्वपूर्ण  घोषणा केली आहे. ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपये आहे त्यांना जीएसटी मधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा याआधी २० लाख रुपये इतकी होती. या व्यतिरिक्त ज्या व्यवसायिकांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रुपयांपर्यंत आहे ते कम्पोजिशन स्कीम निवडू शकतात. गृहपयोगी असलेल्या तेल, टूथपेस्ट, आणि साबणावरील कर कमी करण्यात आला आहे.वित्त मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये उत्पादकांच्या कंपोजीशन रेटमध्ये कपात करण्याचा उल्लेखही आहे. तसेच यापूर्वी केवळ 75 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यापारींना ही योजना निवडण्याचा पर्याय निवडू शकले. दरम्यान, जीएसटी लागू झाल्यापासून बहुतेक वस्तूंवरील कराचा दर कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर 28 टक्के करांच्या खाली लक्झरी वस्तू व नाशवंत वस्तू आहेत. या टॅक्स स्लॅब अंतर्गत 230 वस्तू होत्या, मात्र 200 वस्तू कमी टॅक्स स्लॅबमध्ये घेण्यात आल्या असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

Share: