IMG-LOGO
मुंबई

नवजात बालकांच्या विक्री टोळीत डॉक्टर, तंत्रज्ञ आणि परिचारिकाही!

Monday, Jan 18
IMG

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लहान मुले गायब होण्याच्या घटना वाढल्या होत्या. याच पार्श्‍वभूमीवर मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी या गुन्हेगारांच्या शोधात होते.

मुंबई, दि. १८ जानेवारी  : मुंबईत नवजात बालकांची विक्री करण्यार्‍या टोळीला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या टीमने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये चक्क डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचादेखील समावेश आहे. गरिबीमुळे लहान मुले विकत असल्याचे या तपासात उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लहान मुले गायब होण्याच्या घटना वाढल्या होत्या. याच पार्श्‍वभूमीवर मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी या गुन्हेगारांच्या शोधात होते. ही टोळी लहान मुलांची, नवजात बालकांची खरेदी-विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. नवजात बालकांची खरेदी-विक्री सुरू असल्याची कुणकुण चव्हाण यांना लागली. मुंबईत लहान मुलांची खरेदी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास सुरू केला होता. वांद्रे खेरवाडी येथील ज्ञानेश्‍वर नगरातील महिलांनी आपली मुले एजंटमार्फत विकल्याचे समजताच त्या महिलांना पोलिसानी ताब्यात घेतले. त्यानंतर ज्या एजंटांनी ही मुले विकली, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासाची चक्र फिरत असतानाच, पुढील तपासात लहान मुले विकणारी टोळीच उघडकीस आली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या टोळीत एक डॉक्टर, एक नर्स, एक लॅब टेक्निशियन आणि सहा एजंट्सचा समावेश आहे. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीतील सहा एजंटमध्ये पाच महिला आहेत. हे रॅकेट ज्या महिलांना मुले होणार आहे; मात्र त्या मुलाचे पालन पोषण करण्यास महिला सक्षम नाहीत, अशा महिलांचा शोध घ्यायच्या. त्यांनी बाळाला जन्म दिला, की या नवजात मुलांची खरेदी विक्री व्हायची. आतापर्यंत या टोळीने तीन मुलांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार केला असून, तो पोलिस तपासात उघडकीस आला आहे.पैशांसाठी मुलांची विक्रीअडीच ते साडेतीन लाख रुपयांना मुले विकली जात होती. गरिबी आणि पैशांची चणचण या कारणांमुळे या नवजात बालकांची खरेदी-विक्री सुरू होती. अटक करण्यात आलेल्या टोळीने मोठ्या प्रमाणात लहान मुलांची विक्री केली असल्याची शक्यता योगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

Share: