IMG-LOGO
मुंबई

दाऊदचा हस्तक पिंट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, Jan 21
IMG

अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अंमली पदार्थ तस्करी करणार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाणला पकडले आहे.

मुंबई, दि. २१ जानेवारी :   मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहेत. चिंकू पठाणहा गँगस्टर करीम लालाचा नातेवाइक आणि हस्तक असल्याची माहिती आहे.अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अंमली पदार्थ तस्करी करणार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाणला पकडले आहे. त्याला नवी मुंबईतील घनसोली येथून अटक करण्यात आली आहे. अंमली विरोधी पथकाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर मुंबई अंमली पदार्थ तस्कारांना मोठा हादरा बसला आहे. दरम्यान. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट बाराने दहिसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 19 जानेवारी रोजी केलेल्या कारवाईदरम्यान एक कोटी 60 लाख रुपयांच्या तीन किलो चरससह तीन जणांना अटक केले आहे.

Share: