तुकाराम मुंढे हे प्रशासकीय शिस्तीचे आणि धडाडीने निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
नागपूर, दि. २६ ऑगस्ट : नागपूर महापालिकेचा आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबई येथील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सचिव म्हणून बदली करण्यात आलीय. त्यांच्या ऐवजी आता राधाकृष्ण बी. यांची नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.तुकाराम मुंढे हे प्रशासकीय शिस्तीचे आणि धडाडीने निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांची महाराष्ट्र एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली होती. एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा द्यायची झाले की त्याची गडचिरोलीत बदली केली जाते, असे महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत गमतीने म्हटले जाते. तसेच हे पद होते.महाराष्ट्र सत्तांतर झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. नागपुरात येताच भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना विरोध करायला सुरूवात केली होती. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. मुंढे हे नागपुरात भाजपला अडचणीचे वाटत होते म्हणूनच त्यांना विरोध होत होता, अशीही चर्चा आहे.