IMG-LOGO
COVID-19

भाजपा नेते निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

Sunday, Aug 16
IMG

मुंबई, दि. १६ ऑगस्ट  : भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची  लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसांत  माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे निलेश राणे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.   भाजपमध्ये अमित शहांपासून ते अनेक आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

Share: