IMG-LOGO
राष्ट्रीय

संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

Tuesday, Dec 15
IMG

कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं अनेकाचं मत होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट जानेवारीत बोलावण्यात येईल.

नवी दिल्ली, दि. १५ डिसेंबर : कोरोना साथरोगाचा वाढता प्रकोप पहाता संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा रद्द करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, 'कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं अनेकाचं मत होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन थेट जानेवारीत बोलावण्यात येईल.' बजेट सत्र मागील वर्षी 31 जानेवारीपासून सुरू झाले होते, तर 2018 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू झाले होते.

Share: