लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असल्याचा मोदी यांचा दावा; 88 कोटी सीरिंजची खरेदीनवी दिल्ली, राजकोट दि. ३१ डिसेंबर : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाला प्रतिबंध करणार्या लसीचा ड्रायरन म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने आत्तापर्यंत 83 कोटी सीरिंज खरेदी केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असून त्यासाठी देश सज्ज असल्याची माहिती दिली. दोन जानेवारीला लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये ही तालीम होणार आहे. पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये आत्तापर्यंत लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली आहे. भारतात कोरोना लसीची रंगीत तालीम पार पडते आहे, ही अत्यंत चांगली बाब आहे, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. भारताच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल, असे मोदी यांनी सांगितले. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की 2020 ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलेच शिकवले आहे.भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आले आहे. 2021 मध्ये आपल्याला आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल. भारताने योग्य वेळेत पाऊल उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. 130 कोटी लोकसंख्या असणा-या आपल्या देशात एक कोटी लोकांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे, असे मोदी यांनी या वेळी सांगितले.