IMG-LOGO
महाराष्ट्र

पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

Tuesday, Mar 16
IMG

23 मार्च पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून 30 मार्च रोजी अंतिम मुदत आहे. अर्जाची छाननी 31 मार्च रोजी असून, तीन एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

पंढरपूर, दि. १६ मार्च :  पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून दोन मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या बाबत कार्यक्रम जाहीर केला आहे; मात्र या निवडणुकीवर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, निवडणुकीबाबत प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.23 मार्च पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून 30 मार्च रोजी अंतिम मुदत आहे. अर्जाची छाननी 31 मार्च रोजी असून, तीन एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 17 एप्रिल रोजी मतदान व दोन मे रोजी मतमोजणी होणार आहे. े राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत.सलग तीन वेळा भालके याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जावी, अशी मागणी भालके गटाच्या कार्यकर्त्यांची आहे, तर प्रशांत परिचारक विरोधात निवडणूक लढविणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. शिवसेनेच्या समाधान आवताडे आणि शैला गोडसे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यामुळे पोटनिवडणूकदेखील चुरशी होईल असे जाणकारांचे मत आहे.

Share: