IMG-LOGO
महाराष्ट्र

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिला राजीनामा

Wednesday, Aug 26
IMG

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

परभणी, दि.२६ ऑगस्ट : शिवसेनेसह महाविकास आघाडीला आणखी एक हादरा बसला असून थेट खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सविस्तर सांगितलं आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र, बाजार समितीत पुन्हा राष्ट्रवादीचं अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याने शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत बोलूनही शिवसेनेचं प्रशासक मंडळ नियुक्त न झाल्याने खासदार जाधव नाराज झाले आहेत.  स्थानिक शिवसैनिकांच्या इच्छा आपण पूर्ण करु शकत नसलो, आपल्या कार्यकर्त्यांना योग्यपणे न्याय देता येत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही', अशी भावना खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे. मी खासदार म्हणुन राजीनामा देतो आहे मात्र शिवसैनिक म्हणुन काम करत राहीन अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Share: