भारतीय टपाल खात्यामार्फत 11 सप्टेंबर रोजी अधिक्षक डाकघर मालेगाव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात 3 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे.
मालेगाव, दि. २४ ऑगस्ट : सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमित पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. यात कर्मऱ्यांच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्टाचे संबंधित अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात त्यांच्या तक्रारीची दखल घेवून त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतात.भारतीय टपाल खात्यामार्फत 11 सप्टेंबर रोजी अधिक्षक डाकघर मालेगाव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात 3 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन (पेंन्शन) संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालती मध्ये दाखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे जसे उत्तराधिकारी तथा धोरनात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालतीमध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असाव उदा. दिनांक व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्यांचे नांव, हुद्दा इत्यादी माहितीसह संबंधितांनी आपल्या तक्रारी अधिक्षक डाकघर, मालेगव विभाग, मालेगाव यांच्या कार्यालयात अतिरिक्त प्रतिसह 7 सप्टेंबर 2020 अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही असे आवाहन अधिक्षक डाकघर मालेगाव विभाग मालेगाव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.