आत्तापर्यंत आमदार अण्णा बनसोडेंच्या चार समर्थकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पुणे, दि. १५ मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आणखी दोन समर्थकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हृतिक उर्फ भावड्या वाघमारे आणि आतिश जगताप अशी दोघांची नावे आहेत. कथित गोळीबारातील आरोपी तानाजी पवारला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कंत्राटदार अँथोनीच्या कार्यालयातील दोन कर्मचार्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. आत्तापर्यंत आमदार अण्णा बनसोडेंच्या चार समर्थकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.