IMG-LOGO
महाराष्ट्र

पूजा चव्हाणचा खूनच, आजी शांताबाईचा आरोप; पोलिसांपुढे दिला जबाब

Monday, Mar 01
IMG

मंत्र्यांशी सातत्याने संपर्कात असलेला अरुण राठोड स्वतःच्या मूळगावी असून, दिवसभर बाहेर असतो आणि संध्याकाळी घरी येतो, असा दावा शांताबाई यांनी केला.

पुणे, दि. १ मार्च : वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा देण्यापूर्वी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजा चव्हाण हिची आत्महत्या नसून, खूनच झाला आहगे, असा गंभीर आरोप केला. त्यांनी व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वानवडी पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले. राठोड यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.या प्रकरणात मंत्र्यांशी सातत्याने संपर्कात असलेला अरुण राठोड स्वतःच्या मूळगावी असून, दिवसभर बाहेर असतो आणि संध्याकाळी घरी येतो, असा दावा शांताबाई यांनी केला. त्या म्हणाल्या, की अरुणला खूप मोठे आमिष दाखवण्यात आले आहे. जोपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत अरुण तोंड उघडणार नाही. पूजाच्या आईवडीलांनी लेकरांसाठी आवाज उठवायला हवा. आम्हाला पूजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. पूजाच्या वडीलांनी का आत्महत्या करावी, उलट लेकरासाठी त्यांनी बाहेर पडावे. त्यांच्या मनात काहीतरी कारण असावे. मुलगी कर्तबगार असते, त्या वेळी ती चांगली असते. ज्या वेळी तिच्यावर वेळ येते, त्या वेळी आईवडील का पुढे येत नाही. तरुण तडफदार मुलगी होती. ती मरणारी मुलगी नव्हती. तिचा घात झाला. तिचा खून झालेला आहे. तिचे पोस्टमॉर्टेम होऊ देऊ नका, असे ती व्यक्ती म्हणते त्यातूनच सगळे कळते. काय खोटे आणि काय खरे आहे ते पुरावा शोधायला तुम्ही देशभर फिरणार आहात का? तुमच्याकडे दोन मुले आली, त्यांना तुम्ही घरी सोडून दिले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःची मुलगी समजून त्यांनी पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली.

Share: