कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. कांजूरमार्गच्या जागेचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाही राज्य सरकारनं तो कारशेडसाठी दिला होता.
मुंबई, दि. १६ डिसेंबर : कांजूरमार्ग 'मेट्रो-३' च्या कारशेडचे काम त्वरित थांबवा, परिस्थिती 'जैसे थे' ठेवा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने १६ डिसेंबर या दिवशी राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारी २०२१ मध्ये होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. कांजूरमार्गच्या जागेचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाही राज्य सरकारनं तो कारशेडसाठी दिला होता. वारंवार खोटी कागदपत्र पुढे करत राज्य सरकारनं दिशाभूल केली असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. दरम्यान कोर्टाच्या आदेशाची प्रत हाती आल्यानंतर पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल, असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटलं आहेत. तसंच या कारशेडमुळे राज्य सरकारचे ५५०० कोटी वाचणार आहेत आणि तब्बल १ कोटी लोकांचा प्रवास सुकर होणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.