सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्यावर आंदोलन केले. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपने या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले.
उपमुख्यमंत्र्यांची घोषणा; वाढीव बिलावरून गोंधळमुंबई, दि. २ मार्च : कोरोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाला. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले.सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्यावर आंदोलन केले. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपने या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. सर्वसामान्य नागरिकांच्या वीजजोडासह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतरफडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला वाढीव वीजबिल मुद्द्यांवर फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. राज्यात वीजजोड तोडले जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणले जात आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावर पवार म्हणाले, की राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो, की जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतक-यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीजजोड तोडणे थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचे समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांनी वीजजोड तोडणी थांबवण्याची घोषणा केल्यानंतर फडणवीस यांनी पवार आणि सरकारचे आभार मानले. फडणवीस म्हणाले, की अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, त्याबद्दल मी अजित पवार यांचे आभार मानतो.तोडलेल्यांची वीज जोडाजोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांची वीज तोडली, त्यांना जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे, असे फडणवीस म्हणाले.