IMG-LOGO
महाराष्ट्र

आता महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार: दरेकर

Saturday, Dec 05
IMG

पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ.

सोलापूर, दि. ५ डिसेंबर :  महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सरकार लवकरचं पडणार अशा अनेक बातम्या येत असतात.आता भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपच्या 'मिशन लोटस' बाबत अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही तर सरकारमध्ये येणारच आहोत फक्त कधी ते सांगणार नाही आता डायरेक्ट कृतीच करणारं असं वक्तव्य विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये केलं आहे.पराभवातून काही गोष्टी घेण्यासारख्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. सरकार पाडण्यासंदर्भात आता आम्ही बोलण्यापेक्षा कृतीवर भर देऊ. त्यामुळे भाजपचे इतर नेत्यांनीही सरकार बदलासंदर्भात बोलणे बंद केले तर ते चांगले ठरेल, असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Share: