IMG-LOGO
महाराष्ट्र

राज-उद्धव भेट होता होता टळली

Tuesday, Mar 02
IMG

राज या आधी कधीच मुखपट्टी घालत नव्हते; परंतु विधान भवनात प्रवेश करणा-या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आले आहेत, त्यांचे पालन राज करणार होते का, हा देखील प्रश्‍न विधान भवनात चर्चेत होता.

कोरोना चाचणी न केल्याने विधानभवनात राज यांना नाकारला प्रवेशमुंबई,  दि. २ मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांची भेट आज होता होता टळली आहे. राज हे आज उद्धव यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते; पण राज विधान भवनात आल्यावर त्यांना कोरोना चाचणी करणे आवश्यक होती; पण राज यांनी ही चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आले नाही.राज या आधी कधीच मुखपट्टी घालत नव्हते; परंतु विधान भवनात प्रवेश करणा-या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आले आहेत, त्यांचे पालन राज करणार होते का, हा देखील प्रश्‍न विधान भवनात चर्चेत होता. अखेर कोरोना चाचणी केली नसल्यामुळे राज विधान भवनात आलेच नाहीत. राज आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट त्यामुळे होऊ शकली नाही. वीजबिल प्रश्नासह अन्य मुद्यांवर मनसेने आक्रमक आंदोलने केली होती. राज्यासंबंधी काही प्रश्नावर राज हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार होते; पण आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे राज यांना विधान भवनात येता आले नाही.

Share: