स्टॉयनिस १८ धावांवर माघारी परतला. RRकडून आर्चरनं ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ७ बाद १६१ धावा केल्या.
दुबई, दि. १४ ऑक्टोबर : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील ३० व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येत आहे. अय्यरने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकांसह ५३ धावा केल्या. दोन सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि अॅलेक्स कैरी यांनी दिल्लीला समाधानकारक पल्ला गाठून दिला. स्टॉयनिस १८ धावांवर माघारी परतला. RRकडून आर्चरनं ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीनं ७ बाद १६१ धावा केल्या.