IMG-LOGO
मनोरंजन

रजनीकांत उपचारासाठी रुग्णालयात

Friday, Dec 25
IMG

रजनीकांत यांच्या ’अन्नाथे’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होते. टीममधील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समजल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

हैदराबाद, दि. २५ डिसेंबर  : दाक्षिणात्य अभिनेते आणि सुपरस्टार सजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांच्यावर हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 31 डिसेंबर रोजी रजनीकांत आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.रजनीकांत यांच्या ’अन्नाथे’ या आगामी चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू होते. टीममधील चार सदस्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समजल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या फार्महाऊसमध्ये विलगीकृत होण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला होता. अपोलो रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्या रक्तदाबात मात्र चढ-उतार दिसून आल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. रक्तदाब सामान्य झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.

Share: