नवी मुंबईच्या एका सामाजिक कार्यकर्तीने डॉ. मुदस्सिर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निसार यांनी एका 33 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी लग्नाचा शब्द मागे घेतला.
मुंबई, दि. २ जानेवारी : माहिम दर्ग्याचे ट्रस्टी आणि वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सिर निसार यांच्याविरोधात माहिम पोलिस ठाण्यात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोपेचे इंजेक्शन देत महिलेवर बलात्कार करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या एका सामाजिक कार्यकर्तीने डॉ. मुदस्सिर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निसार यांनी एका 33 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी लग्नाचा शब्द मागे घेतला, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने माहिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. डॉ. मुदस्सिर यांनी पीडितेला झोपेचे इंजेक्शन देवून बलात्कार केला, असादेखील गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे.