IMG-LOGO
महाराष्ट्र

बलात्कार पीडिता तीन गावातून बहिष्कृत

Tuesday, Dec 29
IMG

महिला गावक-यांना त्रास देते, ती व्यभिचारी आहे, असा आरोप करत तीन गावांनी बलात्कार पीडित महिलेसह तिच्या कुटुंबाविरोधात हद्दपारीचा ठराव मंजूर केला.

पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरे वेशीवर; व्यभिचारी असल्याचा आरोपबीड, दि. २९ डिसेंबर : पुरोगामी महाराष्ट्राची लक्तरे वेशीवर टांगल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. बलात्कार पीडित महिलेवर व्यभिचारी असल्याचा आरोप करत पाचेगाव, जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा या तीन गावांनी तिच्यासह कुटुंबाला हद्दपार करण्याचा ठराव घेतला आहे. एवढेच नाही, तर गावक-यांनी या महिलेविरोधात बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातसमोर ठिय्या दिला. ही महिला गावक-यांना त्रास देते, ती व्यभिचारी आहे, असा आरोप करत तीन गावांनी बलात्कार पीडित महिलेसह तिच्या कुटुंबाविरोधात हद्दपारीचा ठराव मंजूर केला. अत्याचार पीडित महिलेला आधार देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हद्दपार करण्याचा निर्णय या गावांनी घेतला. या अमानवीय घटनेनंतर सामाजिक स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. 2015 मध्ये गावातील चार नराधमांनी संबंधित महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हेच गावक-यांच्या जिव्हारी लागले. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर गावातून या पीडित महिलेला त्रास सुरू झाला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला कहर म्हणजे ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या महिलेचा वागणुकीवर संशय घेत गावातून हाकलण्याचा आणि तडीपार करण्याचा ठराव 15 ऑगस्टला घेतला. यानंतर न्यायालयीन लढा देत आपल्या तक्रारीवर ठाम राहून महिलेने चारही दोषींना जन्मठेपेपर्यंत पोहोचवले; पण हीच गोष्ट गावक-यांच्या जिव्हारी लागली. या महिलेला गावातच त्रास सुरु झाला. तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. कहर म्हणजे ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तिच्या वागणुकीवर संशय घेत 15 ऑगस्ट रोजी तिला गावातून हाकलण्याचा ठराव मंजूर केला. आश्‍चर्य म्हणजे म्हणजे ज्या ग्रामपंचायतींनी गावबंदीचा ठराव मंजूर केला, त्या तिन्ही गावांच्या सरपंच या महिलाच आहेत.ही महिला सध्या पाचेगावमध्येच राहते. बलात्कार प्रकरणातील चारपैकी दोन आरोपी जयराम तांडा आणि वसंतनगर तांडा इथे होते. त्यामुळे पाचेगावसह इतर दोन गावातसुद्धा या महिलेला राहायला जागा मिळू नये, यासाठी तिन्ही गावांनी हद्दपारीचा ठराव मंजूर केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही; पण ज्या ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला, त्याची आता जिल्हा परिषदेकडून तपासणी होणार आहेत. त्यानंतर ठराव कोणत्या परिस्थितीत आणि कसे मंजूर केले याची भविष्यामध्ये चौकशी होऊ शकते.महिलेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हादरम्यान, पाण्याच्या कारणावरुन महिलेने मागील आठवड्यात गावातील ग्रामपंचायत सदस्यांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. यावरून कर्मचा-यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला, तर महिलेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत. 

Share: