IMG-LOGO
नाशिक शहर

रत्नमाला देवकर यांचे निधन

Tuesday, Dec 08
IMG

खा. ऊदयनराजे भोसले, खा. संभाजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले (जिंतीकर) आदींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

नाशिक, दि. ८ डिसेंबर : रत्नमाला माधवराव देवकर (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ संपादक विश्वास देवकर यांच्या त्या मातोश्री होत.छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे बंधू संभाजी यांच्या घराण्याशी त्यांच्या मातृकुळाचे नाते होते. संभाजी राजांचे बारावे वंशज ऊमाजीराव राजेभोसले (जिंती घराणे) त्यांचे मामा होते. तरूणाईमध्ये त्या आपल्या मामाबरोबर घोडेस्वारी करत. प्राणीमात्रांप्रती त्या विशेष संवेदनशील होत्या. पती माधवरावांच्या समाजवादी कार्याला व संपादक पुत्राच्या ऊपक्रमांना त्यांनी कायम पाठबळ दिले. खा. ऊदयनराजे भोसले, खा. संभाजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले (जिंतीकर) आदींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त  केले. खातगुण (जि.सातारा) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share: